Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात

चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात
, सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (15:37 IST)
दिवाळीत ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो....  त्यानी फराळ आणून ठेवला, बरोबर ड्रायफ्रुट पण होते. मग ते चहा आणायला आत गेले.....
 
मला पिस्ते फार आवडतात.... चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात माझी नजर समोरच्या CCTV कॅमेऱ्यावर गेली..... इतका राग आला ना..... मी फक्त एकच पिस्ता घेऊन चघळत बसलो..!!
 
ते चहा घेऊन बाहेर आले तेव्हा मी त्यांना विचारलं..... "कॅमेरा कितीला घेतलात?"   तर ते हसत हसत म्हणाले.... "डमी कॅमेरा आहे तो.... मी दिवाळीत नेहमी लावून घेतो." 
 
आता स्थळ विचाराल तर याद राखा..!! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत शर्वरीच्या ग्लॅमरस अंदाजाची धूम