साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते
अनुभवांच्या शिदोरीसकट बोल्डसुद्धा असते
कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज Replace करते
डोळ्यातली लेन्स अन् तोंडातली कवळी सहज adjust करते
नातवंडांबरोबर लहान होते सुनेचीही मैत्रीण होते
संसारात राहूनही स्वतः ची स्पेस जपते.
गाणी गोष्टी मूव्ही नाटक हव्वे तेव्हा बघते
साठी बुद्धी नाठी म्हण सपशेल खोटी ठरते
बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही
लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही
साडी आणि सासू आता discussion बाहेर असते
विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते
अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते
डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते
जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते
साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.