Publish Date: Tue, 14 Aug 2018 (12:39 IST)
Updated Date: Tue, 14 Aug 2018 (12:52 IST)
समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर "शिक्के" न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा -
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची संधी न सोडणं,
तक्रार मात्र जपून करणं...
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं.
रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता