Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राह्मण आणि साप

ब्राह्मण आणि साप
, मंगळवार, 16 मार्च 2021 (09:54 IST)
एकदा एका शहरात हरिदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता.त्याच्या कडे शेत तर होते पण त्याच्या मध्ये पीक कमी होते. एकदिवस हरिदत्त शेतात झाडा खाली झोपला होता.त्याचे डोळे उघडले तर तो काय बघतो की एक साप फण काढून बसला आहे. ब्राह्मणाला जाणवले की हा साप सामान्य नसून कोणी तरी देवरूप आहे. ब्राह्माणाने विचार केला की आज पासून मी ह्याला दररोज दूध देईन.   
त्याने एका भांड्यात त्या सापासाठी दूध आणले आणि त्याला दिले. दूध पाजताना ब्राह्मणाने मनात त्या सापाची क्षमा मागितली आणि त्याला म्हणाला-" हे साप देव मी आता पर्यंत आपल्याला सामान्य सापाचं समजायचो मला आपण क्षमा करा आणि आपल्या कृपेने मला खूप संपत्ती मिळावी.असं म्हणून तो आपल्या घरी परत आला. 
दुसऱ्या दिवशी तो शेतात जातो आणि बघतो की ज्या भांड्यात त्याला दूध दिले होते त्यामध्ये एक सोन्याचे नाणे आहे. आता दररोज हरिदत्त सापाला दूध पाजायचा आणि त्याचा मोबदला म्हणून साप त्याला एक सोन्याची नाणी देत असे. 
काही दिवसा नंतर हरिदत्तला काम निमित्त बाहेर गावी जायचे होते त्याने आपल्या मुलाला साप बद्दल सांगितले आणि समजावले की दररोज त्याला दूध पिण्यासाठी दे. 
आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून हरिदत्तच्या मुलाने सापाला दूध दिले. आणि दुसऱ्या दिवशी त्याला सोन्याचं नाणं मिळाले.
हरिदत्त च्या मुलाने विचार केला की या सापाच्या बिळात एखादा  खजिना असावा. त्याने सापाचं बीळ खणण्याची योजना आखली परंतु त्याला सापाची भीती देखील वाटत होती. त्याने विचार केला की जेव्हा तो साप दूध पिण्यासाठी बाहेर येईल मी त्याच्या डोक्यावर काठीने जोरात मारेन जेणे करून तो साप जागीच थर होईल आणि मी त्याच्या बिळातून खजिना घेईन.आणि जगातील सर्वात श्रीमंत माणूस होईन. 
दुसऱ्या दिवशी आखलेल्या योजनेनुसार, त्याने त्याला दूध प्यायला दिले आणि काठीने जोरदार मार दिला पण तो साप मेला नाही तर रागावला आणि त्या मुलाला दंश केला. सापाने दंश केल्यावर तो मुलगा लगेच जागच्या जागी मेला. हरिदत्त ला परत आल्यावर हे सर्व समजतातच त्याला वाईट वाटले  आणि त्याने सापाची क्षमा मागितली. 
   
शिकवण -लोभाचे फळ नेहमी वाईट असतात. म्हणून म्हणतात की लोभ कधीही करू नये. नेहमी परिश्रम करावे. 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग