एक कोल्हा होता, जो शेतकऱ्याला खूप त्रास देत असे. नेहमी शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन त्याची कोंबडी खात असे.
शेतकरी त्या कोल्ह्याला खूप कंटाळला होता. त्याने कोल्ह्याला धडा शिकवायचे ठरवले.
बऱ्याच दिवसांनी अखेर एके दिवशी तो कोल्ह्याला पकडण्यात यशस्वी झाला.
रागाच्या भरात त्याने कोल्ह्याच्या शेपटीला तेलात भिजलेली दोरी बांधून त्याला आग लावली.
आगीमुळे अस्वस्थ झालेल्या कोल्ह्याने शेतकऱ्याच्या शेतात सगळीकडे धाव घेतली. काही वेळातच शेतकऱ्याच्या संपूर्ण पिकाला आग लागली.
कोल्ह्याची शेपूट तर जळालीच, पण शेतकरीही देशोधडीला लागला! शेतकऱ्याने रागाच्या भरात असे केले नसते त्याचे एवढे मोठे नुकसान झाले नसते.
त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला खूप पश्चाताप झाला. आता राग आल्यावर पुन्हा असे कृत्य करणार नाही असे त्याने ठरवले.