Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेरी सारखे दही बनवा घरच्या घरी, सोपी पद्धत अमलात आणा

डेरी सारखे दही बनवा घरच्या घरी, सोपी पद्धत अमलात आणा
, मंगळवार, 6 जुलै 2021 (11:48 IST)
उन्हाळ्यात दही खाण्याचे बरेच फायदे आहेत. दही साखर किंवा दही इतर पदार्थांसोबत आहारात सामील करणे फायद्याचं असतं. घरात दही जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते. होममेड दहीला एक वेगळा गोडपणा असतो, परंतु बर्‍याच लोकांना घरी दही जमवणे अवघड जातं. कारण त्या लोकांची दही एकतर व्यवस्थित गोठत नाही किंवा ती आंबट होते. दही योग्यरीत्या तयार करण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने आपण सहजपणे बाजारासारखं क्रीमयुक्त दही बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या दही बनवण्याची योग्य पद्धत- 
 
घरी दही तयार करण्यासाठी पूर्ण क्रीम दुधाचा वापर करा, यामुळे दही मलईदार आणि गोड होईल. दही लावण्यासाठी योग्य पात्र निवडा. तुमच्या घरात मातीची भांडी असेल तर त्यात दही जमवा. (आपण स्टीलची भांडी देखील वापरू शकता) दही सेट करण्यासाठी दूध चांगले गरम करा. मग थोडं फेटून घ्या. फेस तयार झाल्यानंतर मातीच्या भांड्यात ठेवा आणि त्यात एक चमचा दही घाला. पात्र न हलविता त्यावर झाकणं झाकून द्या.
 
दही गोठवण्यासाठी उन्हाळ्यात 6 ते 7 तासांची आवश्यकता असते. दही जमल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. मलाईदार गोड दही खायला मिळेल.
 
दही सेट करण्यासाठी एक ठिकाण निवडा जिथे कोणाचाही हात लागता कामा नये. दही इतर खाद्यपदार्थाचा लांब ठेवा कारण हे गंध लवकर शोषून घेतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसीकरणानंतर आठवडाभर कठोर व्यायाम टाळा, हृदयासंबंधी समस्या उद्भवू शकते