असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा तिला काहीच सुचत नाही.त्याला सर्वकाही चांगले वाटू लागते.ते आपला जास्ती वेळ एकमेकांसह घालवतात.एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात,प्रत्येकाला आपल्या जोडीदाराविषयी काही अपेक्षा असतात.प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना चांगला जोडीदार मिळाला पाहिजे.त्याने त्यांची काळजी घ्यावी. प्रामाणिक राहावं.प्रत्येक नातं हे विश्वासावर टिकून असतं.जर विश्वासाला तडा गेला तर नातं संपुष्टात येत.
परंतु काही लोक प्रामाणिक असण्याचा देखावा करतात.आपल्या जोडीदारापासून बरंच काही लपवतात.त्यांच्या वर पारख ठेवतात.जर आपल्याला जोडीदारामध्ये या गोष्टी आढळल्या तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण या मुळे आपली फसवणूक होऊ शकते.चला तर मग जाणून घेऊ या.
1 मोबाईल फोन चेक करणे -जर आपला जोडीदार देखील वारंवार आपला मोबाईल फोन चेक करतो.तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.बऱ्याच लोकांची सवय असते की ते आपल्या जोडीदाराचा मोबाईल तपासून त्यांचे मेसेज वाचतात,कॉल डिटेल्स बघतात.वैयक्तिक फोटो आणि इतर गोष्टी बघतात.असे लोक संशयी असतात.
2 सोशल मीडियावर लक्ष ठेवतात- आजच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे.अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियावर बर्याच गोष्टी शेअर करत असतात. जर आपला जोडीदार आपल्या सोशल मीडियावर लक्ष ठेवत आहे आणि आपल्याकडून पासवर्ड मागत आहे किंवा आपल्या पोस्ट बद्दल काही कॉमेंट करत आहे तर हे आपल्यासाठी संकेत आहे की आपला जोडीदार चांगला व्यक्ती नाही.
3 वारंवार पैसे मागणे- गरजेसाठी कोणाची मदत करणे चांगले आहे परंतु जर आपला जोडीदार आपल्याकडून वारंवार पैशाची मागणी करत असेल आणि नंतर पैसे देत नसेल किंवा पैसे परत देण्यास अनेक सबब सांगत असेल तर हे देखील जोडीदाराविषयी संशयास्पद असू शकतं.
4 माहिती लपवत असेल - कधीही एकमेकांशी काहीही लपवू नये.परंतु बरेच लोक आपल्या जोडीदाराशी आपली वैयक्तिक माहिती लपवतात.आपल्या बद्दल काहीच सांगत नाही.की ते काय काम करतात.ते कुठे राहतात,अशा काही माहिती ते जोडीदाराशी लपवतात.असे लोक विश्वासू नसतात.त्यांच्या पासून चार हात लांब राहणेच योग्य आहे.