Publish Date: Mon, 31 May 2021 (22:15 IST)
Updated Date: Mon, 31 May 2021 (22:22 IST)
साहित्य -
सहा अंडी,बारीक चिरलेली कोथिंबीर,गरम,मसाला,लाल तिखट, पाणी, मीठ,दोन चमचे हरभरा डाळीचे पीठ, कांदा, काळीमिरपूड, ब्रेडक्रम्ब्स, तेल.
कृती -
उकडलेले अंडी किसून घ्या आणि सर्व साहित्य ब्रेडक्रम्ब्स वगळून एकत्र मिसळा.गरजेपुरती पाणी घाला. अंड्याचे मिश्रण चांगले मळून घ्या. चवीप्रमाणे मसाले घाला.या मिश्रणाचे गोलाकार कबाब बनवा.हे कबाब ब्रेडक्रम्ब्स मध्ये गुंडाळा.
कढईत तेल तापत ठेवा आणि तेल गरम झाल्यावर कबाब तेलात तळून घ्या. सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.हिरवी चटणी किंवा सॉस सह गरम कबाब सर्व्ह करा.