साहित्य : चार वाट्या कणीक, दोन वाट्या साखर, एक नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, आठ-दहा वेलदोडे, तळण्याकरिता तूप, पाव वाटी तेल.
कृती : साडेतीन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून व तेल घालून ते पाणी उकळावे. नंतर त्यात कणीक घालून चांगले ढवळावे व दोन वाफा येऊ द्याव्यात. साखर व नारळाचे खोवलेले खोबरे एकत्र करून सारण तयार करावे. शिजविलेल्या कणकेच्या लहान लहान गोळ्या करून त्यात वरील सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पण जाड पोळ्या लाटाव्यात. साधारणपणे मोठ्या पुरीइता आकार असावा. नंतर मंद विस्तवावर तुपात तांबूस होईपर्यंत तळून काढाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा