Publish Date: Fri, 31 May 2019 (09:09 IST)
Updated Date: Fri, 31 May 2019 (10:12 IST)
गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. आपल्याला वास्तु देवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजन अत्यंत शुभ फल देतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तु देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तु दोष नाहीसे होतात.
असे करा दोष दूर
घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसर्या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तू दोष नाहीसा होतो.
घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे. उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याने कार्यात स्थिरता येते.
घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे.
सुख- शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढर्या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे. सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल.