Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या झोपण्याच्या खोलीतून या गोष्टी त्वरित बाहेर काढा

आपल्या झोपण्याच्या खोलीतून या गोष्टी त्वरित बाहेर काढा
, बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:56 IST)
आपल्या घरात आपली झोपण्याची खोलीचं अशी जागा आहे जिथे आपण जगातील सर्व ताण-तणाव विसरून शांतीने आपल्या वैवाहिक जीवनातील सुखाचे क्षण घालवता. पण आपल्याला हे माहीत नसणार की या झोपण्याचा खोलीतील काही वस्तू किंवा गोष्टी आपल्या या शांततेत अडथळा निर्माण करतात. 
 
आपल्या झोपण्याच्या खोलीत येतातच आपल्याला गुदमरल्यासारखे वाटत असल्यास, ताण-तणाव निर्माण झाले असल्यास, आपापसात मतभेद असल्यास, झोप येत नसल्यास आपल्याला हे बघायला हवं की आपल्या झोपण्याच्या खोलीत या अश्या काही गोष्टी तर नाहीत.  
 
1 जोडे : चुकून देखील आपले जोडे चपला झोपण्याच्या खोलीत ठेवू नये. त्यामधून निघणाऱ्या वाईट लहरी आपल्या आयुष्याला उद्ध्वस्त करू शकतात.
 
2 केरसुणी : आपल्या खोलीत केरसुणी ठेवण्याचा अर्थ आहे आपल्यात दररोज वाद विवाद आणि मतभेद होणं. केरसुणी असल्यास त्वरितच खोलीच्या बाहेर काढा.
 
3 फाटलेले कपडे : आपली सवय झोपण्याचा खोलीत फाटके कपडे जमा करण्याची असल्यास ही सवय लगेच मोडून टाका आणि अश्या कपड्यांना लगेचच खोलीतून बाहेर काढा. असे केले नाही तर निर्धनता आणि दारिद्र्यतेेचे आयुष्य भोगावे लागते.
 
4 प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करणं : आपल्याला देखील प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू गोळा करण्याची सवय असल्यास त्यांना झोपण्याचा खोलीत अजिबात ठेवू नये. या पासून निघणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्याला अस्वस्थ करू शकतात.
 
5 टीव्ही : सध्याच्या आधुनिक काळात आपल्या झोपण्याच्या खोलीत टीव्ही ठेवण्याचे फॅशन आहे. पण हे आपल्यासाठी घातक आहेत कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू नकारात्मक लहरी उत्पन्न करतात. हे ठेवणं आपल्याला आवश्यक असल्यास टीव्हीला कपड्याने झाकून ठेवावं.
 
या व्यतिरिक्त धूळ, माती, कोळीचे जाळे, जुनाट सौंदर्य प्रसाधने, रिकामे डबे, डब्या, कॅन, पुसण्याचे फडके, तुटलेली काच, क्रॉकरी, पाळीव प्राणी, खराब पलंग, उश्या, तीक्ष्ण रंगाच्या वस्तू, तुटलेले आणि आवाज करणारे पंखे, या सर्व वस्तू झोपण्याच्या खोलीच्या बाहेरच असाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा