Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

चविष्ट पोह्याचे पकोडे-

delicious poha pakoda recipe
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (21:24 IST)
जर आपल्या घरात पोहे शिल्लक आहे तर ते फेकून देऊ नका त्या पासून चविष्ट पोह्याचे पकोडे बनवू शकता चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
 
साहित्य- 
2 कप पोहे, 2 उकडलेले बटाटे, मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे हरभराडाळीचे पीठ,1/2 चमचा हळद, 1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा आमसूल पावडर, 1/2  चमचा गरम मसाला, तेल तळण्यासाठी.
 
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात पोहे, हरभरा डाळीचे पीठ आणि बटाटे घालून चांगल्या प्रकारे मिसळा. या मिश्रणात इतर जिन्नस घालून चांगल्या प्रकारे मिसळा. थोडंसं पाणी घालून मॅश करून घ्या आणि या मिश्रणाचा आकार पकोडे सारखा बनवा.
कढईत तेल घालून गरम करायला ठेवा आणि त्या तेलात पकोडे सोडा आणि तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. चविष्ट पोह्याचे पकोडे खाण्यासाठी तयार. हे पकोडे सॉस सह सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झोपण्यापूर्वी अवलंबवा या ब्युटी टिप्स त्वचा उजाळेल