मुलांना नेहमीच काही तरी चमचमीत नवीन पदार्थ खावासा वाटतो. दररोज चे काय करावे हा एक मोठा प्रश्न उद्भवतोच. त्या साठी आम्ही आपल्यासाठी खास घेऊन आलो आहोत चटकन बनणारी अशी ही रेसिपी जी आपल्या पाल्याला नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या ही सोपी रेसिपी.
साहित्य -
4 मोठे बटाटे लांब काप केलेले, 7 ते 10 पाकळ्या लसणाचा, 1 चमचा काळी मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे ऑलिव्ह तेल, मीठ चवीपुरती.
कृती -
सर्वप्रथम मायक्रोवेव्ह ओव्हनला प्रीहीट करून घ्या. आता एका भांड्यात बटाटे लसणाच्या पाकळ्या, काळी मिरपूड, मीठ आणि ऑलिव्ह तेल घालून मिसळून घ्या.
आता एका बॅकिंग ट्रे मध्ये ऍल्यूमिनियम फॉईल पसरवून त्यावर बटाट्याचे काप ठेवून द्या. गरम झालेल्या ओव्हन मध्ये सुमारे 40 मिनिटे ट्रे बॅक करण्यासाठी ठेवा. 20 मिनिटा नंतर त्या बटाट्यांना पालटून द्या. 40 मिनिटे झाल्यावर तयार गरम गार्लिक पोटेटोवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सॉस सह सर्व्ह करा.
आपण ही रेसिपी फ्राइंग पॅनमध्ये तयार करु शकता.