साहित्य-
पीठ - दोन कप
तिखट -अर्धा चमचा
कांदा- दोन
ओवा- अर्धा चमचा
आले लसूण पेस्ट- एक चमचा
तूप- चार चमचे
हिरवी मिरची- दोन
चाट मसाला - एक चमचा
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती-
ओनियन पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये पीठ घ्यावे. व त्यामध्ये मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावे. व बाजूला ठेऊन द्यावे. आता कांदे घेऊन बारीक चिरून घ्यावे. आता यामध्ये मीठ मिक्स करून पाच मिनिटांकरिता ठेऊन द्यावे. आता कांद्याने पाणी सोडल्यानंतर हाताने चिरलेला कांदा पिळून घ्यावा व त्यामधील सर्व पाणी काढून घ्यावे. आता यामध्ये तिखट, ओवा, आले लसूण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कोथिंबीर आणि मीठ मिक्स करावे. कणकेचे छोटे छोटे गोळे करून हे मिश्रण भरावे व लाटून घ्यावे. आता तव्यावर हा पराठा दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला ओनियन पराठा जो तुम्ही लोणचे किंवा चटणी सोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik