Publish Date: Wed, 07 Jul 2021 (22:47 IST)
Updated Date: Wed, 07 Jul 2021 (22:49 IST)
साहित्य: 4 बटाटे, 1 कप गव्हाचे पीठ, 2 चमचे रवा, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, तेल.
कृती: बटाट्याचे साल काढून बारीक खिसावे. यात गव्हाचे पीठ, रवा, मिरच्या, जिरे, पाणी घालून जाडसर मिश्रण बनवावे. नॉनस्टिक तव्यावर तेल घालून पीठ पसरून थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे. हिरवी चटणी, दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.