Til Chutney थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तसेच तिळाची चटणी जेवण्याची चव वाढवते. तिळाची चटणी तयार असली तर भाजी-डाळ नसली तरी जेवण्यातील चव कमी होत नाही. ही चटणी खूप दिवस टिकते. अशात तिळाची चटणी तयार करुन बरणीत ठेवून दररोज जेवताना आस्वाद घेता येऊ शकतो. तर चला जाणून घेऊया कशा प्रकारे तयार केली जाते तिळाची चटणी.
साहित्य- 1 वाटी पांढरे तीळ, 1/2 वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरं, 10 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट.
कृती- सर्वप्रथम कढई तीळ मंद आचेवर भाजून घ्या. तीळ छान भाजून झाले की एका ताटात काढून घ्या. नंतर त्याच कढई मध्ये शेंगदाणे आणि जिरं सुद्धा भाजून घ्या. भाजेलेलं साहित्य थंड करून घ्या. नंतर मिक्सर मध्ये भाजेलेलं तीळ, शेंगदाणे, जिरं, मीठ लसूण आणि लाल तिखट घालून भडसर वाटून घ्या. आपली खमंग तिळाची चटणी तयात आहे. ही चटणी भाकरी, चपाती, वरण भात सोबत खूपच चविष्ट लागते.