Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाल्यात वाहून गेलेले 4 महिन्यांचे बाळ अद्यापही बेपत्ता, व्हायरल फोटो खोटा

baby legs
, गुरूवार, 20 जुलै 2023 (17:46 IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असताना कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान नाल्यात वाहून गेलेलं चार महिन्यांचे बाळ अद्यापही बेपत्ता असून बाळाचा शोध सुरु आहे.
 
याच दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नाल्यात वाहून गेलेलं बाळ एनडीआरएफच्या टीमला सुखरूप सापडले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे समजते.
 
व्हायरल होत असलेला फोटो खोटा
‘महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना’ ने व्हायरल पोस्ट ट्विटर वर शेअर केली. पाठोपाठ इतर यूजर्सने देखील ही बातमी शेअर केली. तसेच एका न्यूज वेबसाइटनेही व्हायरल दावा शेअर केल्याने अधिकच गोंधळ निर्माण झाला. मात्र नाल्यात वाहून गेलेल्या 4 महिन्यांच्या बाळाच्या जिवंत असल्याबद्दलच्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत. व्हायरल होत असलेला फोटोचा या घटनेशी कोणताही संबंध नसून एनडीआरएफची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
 
नेमकं काय घडलं होतं?
बुधवारी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली असताना यामधून उतरून एक महिला व एक व्यक्ती 4 महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. तेव्हा व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडल्याची हृदयद्रावक घटना घडली. याही घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर येताच एकच खळबळ उडाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ISRO ने Chandrayaan-3 बद्दल मोठी बातमी सांगितली, International Moon Day वर भारतीयांना एक अनमोल भेट