सोमवार, दि. ९ जानेवारी, २०२३ रोजी राजा शिवाजी विद्यासंकुल, दादर (पू) येथे
मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा ४२ वा वर्धापन दिन समारंभ सोमवार दि. ९ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रिं. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यासंकुल, हिंदू कॉलनी, दादर (पू), मुंबई येथे साजरा होत आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रफुल्ल वानखेडे (सुप्रसिद्ध उद्योजक), विशेष अतिथी मा. श्री. महेश मांजरेकर (अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता) हे उपस्थित राहणार आहेत.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. मकरंद चुरी हे या समारंभाचे अध्यक्ष राहतील. या समारंभात मा. श्री. नितीन वैद्य (संस्थापक व संचालक – दशमी क्रिएशन), मा. डॉ. आनंद पेडणेकर (संचालक – जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्युवेलर्स), मा. श्री. मकरंद प्रधान (कार्यकारी संचालक – टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम लि.), मा. सौ. स्वाती बेडेकर (संस्थापक – एस. एम. ग्राफिक्स), मा. श्री. प्रदीप मुळये (नेपथ्यकार, दिग्दर्शक व निर्माता) अशा विविध क्षेत्रातील पाच यशस्वी उद्योजकांचा मराठी उद्योग भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहेत.
Deepak Jadhav