मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका चालत्या कारला अचानक भीषण आग लागली. गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने तेथे गोंधळ उडाला. रस्त्यावर जाम होता. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंबईतील जोगेश्वरी पुलावर सोमवारी दुपारी एका चालत्या बीएमडब्ल्यू कारला अचानक आग लागली. त्यामुळे काही मिनिटांतच कार जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या इंजिन मधून ही आग लागली अद्याप याला दुजोरा मिळाला नाही. पाहतापाहता तिने पूर्ण कारला वेढा घातला आणि क्षणातच कार जळून खाक झाली.
सुदैवाने या मध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओ मध्ये जोगेश्वरी पूलावर एका बीएमडब्ल्यू कार जळताना दिसत आहे. या अग्निकांडामुळे वाहतूक काहीवेळासाठी विस्कळीत झाली होती.
सदर घटना दुपारी 1:15 च्या सुमारास घडली आहे. दुपारी 2 वाजे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.