Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिरेन आणि वाझे यांच्यात १० मिनिटं चर्चा झाली, सीसीटीव्हीत आले दिसून

हिरेन आणि वाझे यांच्यात १० मिनिटं चर्चा झाली, सीसीटीव्हीत आले दिसून
, शुक्रवार, 19 मार्च 2021 (15:59 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात असणारी अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. 
 
यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता.
 
सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.
 
काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं तिथे गाडी पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोना