मेट्रो 3च्या पहिल्या ट्रेनची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या प्रकल्पाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. मेट्रो 3 ला कोणीही थांबवू शकत नाही. मेट्रो 3 ही मुंबईची लाईफलाइन आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेडला मंजूरी दिली आहे. जवळपास 17 लाख लोक मेट्रो वापरतील आणि 7 लाख वाहन रस्त्यावर धावायची कमी होतील. तसेच मेट्रोमुळे पर्यावरणाचा धोका कमी होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय् तुमचे अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यावेळी या 40 किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.