मुंबईतील वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला अखेर सुरुवात झाली आहे. मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ च्या या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला. हा पहिला टप्पा मेट्रोच्या 67 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आरे सारीपूतनगर इथे ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला. ज्यानंतर सारीपूतनगर ते मरोळ नाका येथील ट्रॅकवर ट्रायल रन घेण्यात आली. सारीपूतनगर ते मरोळ नाका स्थानकादरम्यान 3 किमी लांबीच्या बोगद्यात ही चाचणी घेण्यात आली, ज्यात बीकेसी आणि धारावीला जोडण्यासाठी 3 भुयारी मार्ग आहेत. एकूण 8 डब्ब्यांची ही पहिली मेट्रो असणाक असून प्रत्येकी 42 टन वजनाचा कोच या मेट्रोला जोडला जाईल. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) 33.5 किमी लांबीचा भूमिगत मेट्रो कॉरिडोर तयार करत आहे.
एमएमआरसीएल अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा सर्वप्रथम विचार केला जाईल. त्यानंतर मध्यम आणि हाय वोल्टेजवर ट्रेनची चाचणी केली जाईल. त्याशिवाय ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी होईल. मेट्रो-3 ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. ज्यात 1000 किमी ट्रायल रन सहा महिन्यांच्या कालावधीत केले जातील, या ट्रायल्स रन तात्पुरत्या सुविधा क्षेत्रापासून सुरु होणाऱ्या बोगद्यांमध्ये घेतल्या जातील. मात्र आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी MMRCL ला 8 मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे.
33.5 किमी लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणारा मार्ग दोन टप्प्यांत सुरु होईल. यातील MMRCL सीप्झ आणि बीकेसी दरम्यानच्या कॉरिडॉरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत होईल तर बीकेसी आणि कुलाबादरम्यानचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मेट्रो 3 मार्गाचे कामं 2021 पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यावेळी हा खर्च 23,136 कोटी रुपये होता. मात्र काही कारणास्तव हे काम रखले आणि आता हाच खर्च आता 37,275 कोटी रुपयांवर पोहचला आहे.