डोंबिवली एमआयडीसीमधील प्रदुषणाबाबत उद्योजक तसेच नागरिकांशी चर्चा केल्यानंतरही प्रदूषण नियंत्रणात आले नाही. राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण विभागाने वारंवार सूचना देऊनही ज्या कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रित केले नाही. अशा कंपन्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून अशा कंपन्यांना ज्या निवासी वसाहतीपासून 50 मीटरवर आहेत, त्यांनी येथे उत्पादन करू नये. यासाठी अशा प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये मांडलेल्या निवेदनाच्या उत्तरात सांगितले.
कंपन्यांची डोंबिवलीतील जागा काढून घेतली जात नसून केवळ त्यांचे उत्पादन पातळगंगा येथे करण्यात येत असल्याचेही मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
यासंदर्भातील निवेदन विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी सादर केले होते.