MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक केली आहे. राहुलने दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
4 दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तेव्हा शवविच्छेदन अहवातून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.
प्रकरण नेमके काय?
राहुल हंडोरे हा दर्शना पवारचा दूरच्या नात्यात असून गेली अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. राहुलला दर्शनासोबत लग्न करायचे होते मात्र नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता. दर्शनाचं लग्न इतरत्र ठरवण्यात आलं होतं तसेच नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) ती तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार करण्यात आला होता तेव्हा ती पुण्यात असताना 12 जून रोजी मैत्रिणीला सिंहगडावर जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. तिच्यासोबत राहुल हंडोरे होता. दरम्यान कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर तिचा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांनी शोध सुरू केला. नंतर दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत देण्यात आली दरम्यान राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आला. तेव्हा कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली होती.
इकडे रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला. हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्हीवरुन कळून आले की दर्शना आणि राहुल सकाळी 6.15 मिनिटाच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. नंतर दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला.