Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

arrest
, रविवार, 22 डिसेंबर 2024 (16:35 IST)
कल्याणच्या आय फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राजेश दखिनकर यांच्या माहितीवरून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या आणि डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण 15 दिवसांपूर्वी बांगलादेशातून आले होते आणि त्यातील काही एका कापड कंपनीत काम करत होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बांगलादेशला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या सहाय्याने हे लोक भारतात आले आणि डोंबिवलीत राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. वेळोवेळी बांगलादेशींच्या अशाच अटकेच्या घटना घडतात. मात्र ही समस्या काही संपत नाही. मानपाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे या बांगलादेशी नागरिकांना शहरात कोण एन्ट्री देतंय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

डोंबिवली आणि परिसरात बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांचे जाळे यापूर्वीच पसरले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी या दिशेने कधीच ठोस पावले उचलली नाहीत. सखोल तपास करून अशा घुसखोरांचे जाळे तोडून शहरात राहणाऱ्या अवैध नागरिकांचा शोध घेणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परभणी हिंसाचार आणि बीड सरपंच हत्येमुळे शरद पवार चिंतेत