बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याच्या सहकार्यांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर पूनमने उच्च न्यायालयाची मदत घेण्याचे ठरवले तर कुंद्राने स्पष्टीकरण देताना डिसेंबर 2019 मध्ये त्याने संबंधित कंपनी सोडल्याचे म्हटले.
जगभरातून सध्या पूनमला अनेक निनावी फोन येत आहेत. या फोन कॉलमुळे पूनम पूर्णपणे वैतागली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षी जून महिन्यात एक टॅगलाइन (कॉल मी, आय स्ट्रिप फॉर यू ) तिच्या अॅपवर लीक झाली होती. पूनच्या मते, तिचे अॅप राज कुंद्राची कंपनी चालवत होती..
एका महिन्यातच कुंद्राच्या कंपनीसोबतचा अॅपचा करार पूनमने संपवला होता. मात्र करार संपूनही तिचा अॅप सक्रिय ठेवण्यात आला. पूनच्या तक्रारीनुसार या नंतर तिला निनावी फोन येऊ लागले.
कंपनीला दिली होती माहिती
मुलाखतीत पूनम पांडे म्हणाली की, मार्च 2019 मध्ये माझ्या नावाचे अॅप सुरू करण्यासाठी मी कंपनीकडे मदत मागितली होती. अॅपच्या माध्यमातून मिळणार्या कमाईचा पैसा किती भागीदारी असेल यावरही आमचे बोलणे झाले होते. मात्र नंतर मला हा करार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे वाटले.
पांडे म्हणाल्या की, करार संपला तरीही माझे फोटो आणि व्हिडीओ अॅपवर टाकले गेले. एवढेच नाही तर माझ्या खासगी नंबरवरून अश्लील मेसेजही पाठवले गेले. ते मेसेज पाहून मला हजारो फोन आले. या सर्वामुळे माझे जगणे असह्य झाल्याने कंपनीच्या विरोधात जाण्याचा निर्णय मला घ्यावा लागला.