Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळे यांची संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर चपराक लगावणारी पोस्ट

sule sambhaji bhide
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (12:10 IST)
वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मंत्रालय परिसरात महिला पत्रकाराविषयी केलेले वक्तव्य गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले असताना मंत्रालयाबाहेर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा 'तू आधी कुंकू लावून ये, मगच तुझ्याशी बोलेन', असे ते म्हणाले.
 
'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली होती.
 
यावेळी भिडे गुरूजी म्हणाले की, आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. या वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून सुप्रिया सुळे यांनी देखील यावर चपराक लगावणारी पोस्ट केली आहे. त्यांनी हेरंब कुलकर्णी यांनी लिहीलेली कविता पोस्ट केली आहे. 
 
मी लावतो टिळा
 
तू लाव टिकली
 
परंपरेच्या बाजारात
 
अक्कल आम्ही विकली
 
मी लावतो भस्म
 
तू लाव कुंकू
 
गुलामीचा शंख
 
दोघे मिळून फुंकू
 
तू घाल मंगळसूत्र
 
मी घालतो माळ
 
मनूने मारलेली रेषा
 
मनोभावे पाळ
 
तू घाल बांगड्या
 
माझ्या हातात गंडा
 
मुकाट्याने ऐक नाहीतर
 
आमच्या हातात दंडा
 
मी घालतो मोजडी
 
तू जोडवे घाल
 
सप्तपदी च्या मर्यादेत
 
जन्मभर चाल
 
तू घाल अंबाडा
 
मी शेंडी राखतो
 
विज्ञानाच्या प्रगतीला
 
परंपरेने झाकतो
 
मी घालतो टोपी
 
तू घाल बुरखा
 
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
 
एकमत आहे बर का...!!!
 
मी धोतरात, तू शालूत
 
होऊ परंपरेचे दास
 
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
 
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!
 
हेरंब कुलकर्णी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदिवासींच्या हक्कासाठी लढणार्‍या कुसुम कर्णिक यांचं निधन