Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

apghat
, सोमवार, 2 डिसेंबर 2024 (16:26 IST)
मुबंईत दुचाकीवरून जात असलेल्या पती पत्नी आणि मुलीला ट्रक ने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आणि पतीला देखील किरकोळ दुखापत झाली आहे.तर 2 वर्षाची मुलगी सुदैवाने सुखरूप बचावली आहे. मुंबईतील मुलुंड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. 

सदर घटनाला शनिवार रात्री मुलुंड पूर्व येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे एका 34 वर्षीय शिक्षिकेचा दुर्देवी मृत्यू झाला तर महिलेच्या पतीला किरकोळ दुखापत झाली. तर मुलगी रस्त्यावर पडून बचावली. 
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. अपघातात मृत्युमुखी झालेल्या महिलेचे नाव अमृता पुनमिया असून ती मुलुंड पश्चिम येथे पती आणि मुलीसह राहत होती. अमृता या एका शाळेत शिक्षिका होत्या व महिलेचा पती एका खाजगी कंपनीत कामाला होता. 

हा अपघात 30 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास फोर्टिस हॉस्पिटल जवळ घडला. दुचाकीवरून नातेवाईकांच्या घरी जात असताना एका ट्रक ने दुचाकीला धडक दिली या मध्ये अमृता आणि त्यांची मुलगी रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या मागच्या चाका खाली आल्या अमृता यांचा जागीच मृत्यू झाला 

त्यांना रुग्णालयात नेले असता त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पतीलाही किरकोळ दुखापत झाली असून  मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 281 (निष्काळजीपणे वाहन चालवणे), 106 (मृत्यूस कारणीभूत) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अपघात झाल्यास चालकाचे कर्तव्य) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाला लगेच अटक करण्यात येईल असे सांगितले जात आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या