Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार ?

काय म्हणता, मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार ?
, सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:30 IST)
मुंबई महापालिकेच्या प्रभागरचना आराखड्याला मंजुरी देण्यात आलीय. आता मुंबई आणि उपनगरातील 236 वॉर्डांच्या निवडणुका निवडणूक आयोग लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार असल्याची चर्चा आहे.
 
7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपणार असून, निवडणुका एप्रिलअखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी 1978 आणि 1985 मध्ये लागोपाठ दोनदा तत्कालीन सरकारकडून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मुदतवाढ देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुदतवाढ न देण्यासंदर्भात 1992 साली केंद्र सरकारकडून कायदा करण्यात आला होता. 
 
मात्र त्यानंतर अशी मुदतवाढ न देण्यासंदर्भात 1992 साली केंद्र सरकारकडून कायदा करण्यात आला होता. याच कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडूनही करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदतवाढीची प्रक्रियाच अडचणीत आली. 7 मार्च 2022ला मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर हाच नियम लागू होणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 236 वॉर्डांच्या प्रभागरचनेत खुल्या प्रवर्गात ओबीसींच्या समावेशासह 219, एससी 15 आणि एसटी प्रवर्गासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्यात.
 
मुंबई महापालिकेची निवडणूक 8 मार्चनंतरच जाहीर केली जाणार आहे. त्यापुढील काळासाठी प्रशासक नेमावा लागेल. मुंबई महापालिका कायद्यात तशी तरतूद आहे. तारीख जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रशासक काम पाहायला सुरुवात करेल, असंही मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणालेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी वाईन पिऊन गाडी चालवली तर तुम्ही मला जवळचा बार दाखवाल की, तुरूंगात टाकाल?