Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक! शिवसेना भवनासमोर घडली घटना

aditya thackeray
, बुधवार, 28 जून 2023 (21:40 IST)
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर हा प्रकार घडला असून बाईकस्वाराची सध्या कसून चौकशी केली जात आहेत. या अपघातात बाईकस्वाराला कसलीही दुखापत झाली नसून आदित्य ठाकरे यांच्या गाडीला खरचटलं आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनला येत होते. ते शिवसेना भवनसमोर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला टन घेत होते.
 
यावेळी मागून येणाऱ्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. या धकडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. बाईकस्वार हा गाडीला धडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्या बाईकस्वाराला पकडलं. नंतर पोलिसांकडून या बाईकस्वाराची चौकशी सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करावे- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे