Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी
, शनिवार, 19 मार्च 2022 (12:38 IST)
कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. येथील पावागडा  जिल्ह्यात शनिवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. 

. याआधी मंगळवारीच राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील बनविकल्लू येथे एक वाहन उलटले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर झालेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. अपघात झाला तेव्हा प्रवासी रामेश्वरमच्या दिशेने जात होते, असे वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी इतरांचाही रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BSNL च्या गोदामाला आग; केबल जळून लक्षावधी रुपयांची हानी