पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान यांना भारताच्या सुर्पुद केले. भारतीय कूटनीती आणि सक्त व्यवहारापुढे वाकत पाकिस्तानने गुरुवारी भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमानची सुटका करण्याचे घोषित केले गेले होते. त्यांच्या स्वागासाठी मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते. सकाळपासूनच वाघा बार्डरवर लोकांनी गर्दी केली होती.
अभिनंदन यांचे आगमन म्हणून बीटिंग द रिट्रीट सोहळा देखील रद्द करण्यात आला होता. अभिनंदन यांना रिसीव्ह करण्यासाठी सैन्य अधिकारी आणि त्यांचे कुटुंब देखील वाघा बार्डरवर उपस्थित होते. त्यांच्या वापसीमुळे पूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. तिरंगा घेऊन लोकं अभिनंदनची एक झलक बघण्यासाठी आतुर झाले होते. अटारी बॉर्डरवर सकाळपासून भारता मात की जय आणि वंदे मातरम नारे लावले जात होते.
इकडे चेन्नईहून दिल्ली येत असलेलं विमान जेव्हा गंतव्यवर थांबलं तेव्हा देखील कोणत्याही प्रवाश्याला बॅग घेण्याची किंवा बाहेर जाण्याची घाई नव्हती कारण सर्वांची नजर केवळ पायलट अभिनंदन यांच्या आई-वडीलांवर टिकलेली होती. एअर मार्शल (सेवानिवृत्त) एस वर्थमान आणि डॉ. शोभा वर्थमान यांच्या सन्मानात शुक्रवारी पहाटे विमानमधील प्रवश्यांनी उभे राहून टाळ्या बाजवल्या आणि त्यांना आधी उतरण्याची संधी दिली.
तसेच तामिळनाडूच्या चेन्नई येथील कलिकांबल मंदिरात शुक्रवारी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान परदेशात परतणार म्हणून धन्यवाद प्रार्थना केली गेली.