कानपूर हायवेवर टोमॅटोने भरलेला ट्रक उलटला, ते पाहून टोमॅटो लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. पण त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महागड्या टोमॅटोच्या संरक्षणासाठी रात्रभर पहारा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील झाशी येथील कानपूर हायवेवर दिल्लीला टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक एका महिलेला धडकून पलटी झाला. त्यामुळे ट्रकमध्ये भरलेले टोमॅटो रस्त्यावर पसरले. बाजारात 100 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो लुटण्याआधीच सिपरी बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकभोवती नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना टोमॅटो लुटता आला नाही. पोलिसांनी रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत टोमॅटोचा पहारा ठेवला होता. टोमॅटोचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
Edited By- Dhanashri Naik