देशातील सर्वात जुनी कंपनी एअर इंडिया ने येत्या काही काळात कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत प्रत्येक महिन्याला कंपनी नवीन 500 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीकडून येत्या वर्षभरात 900 नवे वैमानिक तर 4200 केबिन कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने विस्ताराची मोठी योजना हाती घेतली असून नवीन 470 विमानांची खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे.
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांच्या म्हणण्यानुसार, दर महिन्याला 500 हून अधिक क्रू मेंबर एअर इंडियामध्ये सामील होतील आणि एअरलाइन लवकरच एक नवीन क्रू रोस्टरिंग प्रकल्प सुरू करेल .
प्रत्येक महिन्याला 500 हून अधिक नवीन क्रू सेवेत समाविष्ट करून प्रशिक्षण वाढविण्यात सक्षम होईल, विल्सन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, प्रणाली सुधारत असताना, क्रू सदस्य पूर्वीपेक्षा अधिक संघटित आणि अधिक स्थिर रोस्टरचा लाभ घेण्यास सक्षम होतील. यामुळे विमान कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यातही मोठी मदत होईल.