Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठी बातमी! श्रीनगर विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा कट फासला

मोठी बातमी! श्रीनगर विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा कट फासला
, बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:12 IST)
श्रीनगर विमानतळाजवळ मोठा बॉम्ब स्फोट करण्याची दहशतवाद्यांची योजना उधळून लावली आहे. यासाठी त्यांनी विमानतळाजवळील गोगो गल्लीत स्टीलच्या बॉक्समध्ये आयईडीही ठेवला होता,परंतु सुरक्षा दलांनी हा आयईडी वेळीच शोधला नाही तर बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने तो निष्क्रिय केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मध्य काश्मीरच्या जिल्हा बडगाममधील विमानतळ रोडच्या हुम्हामा भागात मंगळवारी सकाळी गस्त घालत असताना सुरक्षा दलांनी एक इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (IED) दिसले.
हुम्हामा परिसरातील गोगो रस्त्याजवळ एका गल्लीत सुमारे 6 किलो वजनाच्या स्टीलच्या डब्यात आयईडी लावण्यात आल्याचे समजल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसर सील केला. जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी बोलावले .पथकाने घटनास्थळी पोहोचून आयईडीची तपासणी केली.
 
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते,सहा किलो वजनाचा हा आयईडी खूप धोकादायक ठरू शकला असता.जर ह्याचे स्फोट झाले असते तर यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांचे खूप नुकसान झाले असते. विमानतळाच्या जवळ असल्याने येथे सुरक्षा दल वारंवार ये -जा करतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न