Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवादा येथील काँग्रेस आमदाराच्या घरात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

death
, रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (16:19 IST)
बिहारमधील नवादा येथील काँग्रेस आमदाराच्या घरात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिसुआ येथील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांच्या घरात तरुणाचा मृतदेह सापडला आहे. परिसरातील नागरिकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. 

हे प्रकरण हिसुआ विधानसभेच्या नरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पियुष कुमार उर्फ ​​सुद्दू असे या मयत 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. 
 
त्याचे वडील आधीच मरण पावले आहेत. ज्याचा मृतदेह सापडला तो पियुष हा आमदाराचा वैयक्तिक सहकारी प्रिन्स कुमारचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
घटनेची माहिती मिळताच नवादाचे पोलीस अधीक्षक आमदारांच्या घरी पोहोचले आणि 
 प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी एफएसएल आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. पोलिसांनी सर्व पुरावे.गोळा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
 
सध्या पियुषच्या हत्येचे कारण समोर आलेले नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की आमदार 25 ऑक्टोबरपासून पासून पाटण्यात होते आणि घर रिकामे होते, आमदारांच्या कुटुंबातील एकही सदस्य घरात उपस्थित नव्हता. 
दुसरीकडे या हत्येत गोलू सिंगचे नाव समोर येत आहे. तो आमदार नीतू सिंह यांच्या दीर सुमन सिंह आणि काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष आभा सिंह यांचा मुलगा आहे, तर मृत तरुणही आमदाराच्या कुटुंबातील सदस्य आहे. गोलू आणि मृत पियुष हे चुलत भाऊ होते. 
 
दुपारी साडेचार वाजता नरहाट पोलीस स्टेशनला हिसुआच्या आमदार नीतू सिंह यांच्या घरातील एका बंद खोलीत एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती.  माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घराची तपासणी केली असता एका खोलीत मृतदेह आढळून आला. आमदार नीतू सिंह यांचे दूरचे नातेवाईक पियुष सिंग असे मृतदेहाची ओळख पटली. ज्या खोलीत मृतदेह सापडला ती गोलू सिंगची होती. गोलू सिंग हा नीतू सिंगचा पुतणा असून त्याच्यावर प्राथमिक संशय आहे 

पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतले आहे. पीयूषची हत्या कशी झाली  या हत्येमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने  सांगितले की, शुक्रवारी रात्री 7 वाजेपर्यंत पियुष घरीच होता. शनिवारी तो गोलू सिंगच्या घरी गेला होता, त्यानंतर तो घरी परतला नाही दरम्यान, रात्री त्यांची हत्या करण्यात आली.  
 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुगाड करून दुचाकी बाईकची चारचाकी बाईक केली, व्हिडीओ व्हायरल!