Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

car under plane
, मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:30 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी 'गो फर्स्ट' या एअरलाइन्सची कार 'इंडिगो'च्या 'ए320 निओ' विमानाखाली आली, मात्र ती 'नोज व्हील' (पुढील चाकाला) किरकोळपणे आदळली तरी बचावली. विमानतळावर उपस्थित असलेल्या एकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान VT-ITJ दिल्लीच्या IGI विमानतळाच्या T-2 टर्मिनलवर उभे होते. दरम्यान अचानक एक टॅक्सी त्यांच्या पुढच्या चाकाखाली आली. मात्र, वेळीच टॅक्सी थांबल्याने अपघात टळला.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाची चौकशी करेल. विमान उद्योगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'इंडिगो' या विमान कंपनीच्या विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही.
 
सूत्रांनी सांगितले की, विमान मंगळवारी सकाळी ढाका (बांगलादेशची राजधानी) कडे रवाना होणार असताना 'गो फर्स्ट' या विमान कंपनीची कार त्याच्या खाली आली, परंतु नाकाच्या चाकाला आदळल्याने ते थोडक्यात बचावले.
 
या संदर्भात निवेदनासाठी 'इंडिगो' आणि 'गोफर्स्ट' या दोन्ही एअरलाइन्सशी संपर्क साधण्यात आला असला तरी अद्याप दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश