चेन्नईतील एका ज्वेलरच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या तब्बल 90 कोटी रुपयांची रोकड आणि 100 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. चेन्नईत 8 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केल्याची माहिती आहे.रोकडीपैकी 8 कोटींची रक्कम नव्या नोटांच्या स्वरुपात आहे. 65 कोटी रुपये हे चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजारच्या नोटांच्या रुपात आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयकर विभागाने 400 पेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांचा तपास केला. 6 डिसेंबरपर्यंत 130 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.बंगळुरुमध्ये चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा सापडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.