Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनिया गांधी यांचा कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता

सोनिया गांधी यांचा  कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता
, गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:28 IST)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला विशेष सुरक्षा गटातील (एसपीजी) कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. राकेश कुमार (३१) कमांडो असे नाव आहे. 

राकेश कुमार हा द्वारका परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. १ सप्टेंबर रोजी राकेश कुमार ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. घरातून निघताना तो गणवेशातच होता. १० जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आल्यावर त्याने सहकाऱ्यांची भेट घेतली. काही वेळाने तो तिथून निघून गेला. जाताना तो रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल फोन बंगल्यावरच ठेवून गेला. राकेश कुमारला अतिरिक्त वेळ थांबावे लागल्याने तो घरी आला नाही, असे सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. मात्र दोन दिवस उलटूनही राकेशशी संपर्क होत नसल्याने त्यांनी १० जनपथ गाठले. राकेश कुमार बेपत्ता असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. 

राकेश कुमारला १ सप्टेंबररोजी सुट्टी होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तो घरातून ड्यूटीसाठी का निघाला असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे. सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडो बेपत्ता झाल्याची दखल सुरक्षा दलांनीही गांभीर्याने घेतली आहे. दिल्ली पोलीस या कमांडोचा शोध घेत आहेत. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार