सध्या जगातील इतर देशात मन्कीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे. अनेक देश या आजाराचा सामना करत आहे. या विषाणूचा संसर्ग इतर देशात वाढत असून आता भारतात देखील या विषाणूची एंट्री झाली असून मन्कीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. रुग्णाची अधिक माहिती दिली नसून रुग्णाला आयसोलेट केले आहे. संशयित रुग्ण नुकताच मन्कीपॉक्स संसर्गाने ग्रस्त देशातून परत आला होता.
संशयित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. ची लक्षणे एनसीडीसीने आधीच नोंदवलेल्या लक्षणांशी सुसंगत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
याबाबत पुरेशी खबरदारी घेतली जात असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. आणि सर्व प्रोटोकॉल्सची काळजी घेतली जात आहे. अशा वेगळ्या प्रवासाशी संबंधित प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे.
मंकीपॉक्स संसर्ग अनेक प्रकरणांमध्ये गंभीर आणि प्राणघातक मानला जात असल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला 'ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी' घोषित केले. मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता, भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, MPox हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो संक्रमित वस्तू, जवळचा संपर्क आणि शरीरातील द्रवपदार्थांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तीने वापरलेले कपडे, चादरी, टॉवेल इत्यादी वस्तू वापरणे टाळा. शरीरातील द्रव किंवा संक्रमित व्यक्तीच्या जखमांच्या संपर्कात येऊन संसर्ग पसरण्याचा धोका देखील असू शकतो. समाजात सामाजिक अंतर पाळा असे आवाहन केले आहे.