Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनावट कोरोना लस बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, आंतरराज्य टोळीतील 5 जणांना अटक

बनावट कोरोना लस बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, आंतरराज्य टोळीतील 5  जणांना अटक
, गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (12:24 IST)
वाराणसी: बनावट कोरोना लस आणि चाचणी किट बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. स्पेशल टास्क फोर्सने छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट लसी आणि चाचणी किट जप्त केल्या आहेत. आंतरराज्य टोळीतील पाच जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
 
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील आहे. स्पेशल टास्क फोर्सला लंका प्रदेशातील रोहित नगरमध्ये बनावट कोरोना लस आणि चाचणी किटचे उत्पादन करणारे युनिट सापडले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी बुधवारी घटनास्थळी छापा टाकला आणि बनावट लसी आणि चाचणी किट जप्त केल्या. पोलिसांनी बनावट Covishield आणि Zycov-D शीशांसह अनेक कार्टन्समध्ये पॅक केलेल्या चाचणी किट देखील जप्त केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पॅकिंग मशीन, रिकाम्या कुपी आणि स्वॅब स्टिक्सही जप्त करण्यात आल्या आहेत.
 
यासह आंतरराज्य टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश थवानी, संदीप शर्मा, लक्ष्य जावा, समशेर आणि अरुणेश विश्वकर्मा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौकशीदरम्यान, राकेशने कबूल केले की तो आणि त्याचे सहकारी बनावट लसी आणि चाचणी किट तयार करण्यात गुंतले होते.
 
स्पेशल टास्क फोर्स आता त्यांचे नेटवर्क शोधण्यात व्यस्त आहे. यासोबतच कोणत्या औषध विक्रेत्यांनी कोणत्या राज्यात बनावट लसी आणि किटचा पुरवठा केला आहे, हे शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार