शबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस संरक्षण देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना दिला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केवळ प्रथम प्रवेश केलेल्या दोन महिलांनाच सुरक्षा देण्यात येईल, असे स्पष्ट केले. याचिकेतील इतर महिलांनी प्रवेश केलेल्यांचा विचार केला जाणार नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
महाविद्यालयीन प्राध्यापिका तसेच सीपीआय कार्यकर्त्या असलेल्या ४२ वर्षीय बिंदू आणि शासकीय नोकरीत असलेल्या कनकदुर्गा यांनी २ जानेवारीला शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता.