अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर गंभीर जखम झाल्याचे तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे.
गुरुवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या पक्षाने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन ममता बॅनर्जी यांचे तीन फोटो टाकले होते. त्यात त्यांच्या कपाळावर जखम झाल्याचे दिसत आहे.
ममता बॅनर्जी यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ममता बॅनर्जी आता रुग्णालयाबाहेर पडल्या आहेत. त्यानंतर आता त्यांना एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.
त्यांना जखम कशी झाली याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आली नाही.
पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या समवेत अनेक नेते आणि मंत्रीमंडळातले सदस्य देखील रुग्णालयात आले होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर टाकून ममता बॅनर्जी लवकर बऱ्या व्हाव्यात अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री खाली पडल्याची माहिती मिळाली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कपाळावर व नाकावर जखमा आहेत.त्यातून रक्तस्त्राव होत होता.
कपाळावर तीन टाके तर नाकाला एक टाके घालण्यात आले आहेत. त्यांचे ईसीजी आणि सीटी स्कॅनही करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला होता पण त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री घरीच राहतील देखरेखीखाली. डॉक्टरांची टीम त्याची काळजी घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांना कुणीतरी मागून ढकललं मुख्यमंत्र्यांच्या वहिनी कजरी बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना मागून धक्का लागल्याचे त्यांनी ऐकले. मात्र कोणी ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ममता बॅनर्जी यांना एनएसजी सुरक्षा देण्याची मागणी टीएमसी समर्थकांनी केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ममता त्यांच्या घरीच जखमी झाल्या आहे. कॅम्पसमध्ये चालत असताना पडल्याने ममता गंभीर जखमी झाल्या . त्यांना एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कपाळावर टाके घालण्यात आले आहेत. तृणमूलच्या एक्स हँडलने (पूर्वीचे ट्विटर) ममतांचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते.