Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

शहीद वरुण सिंह यांच्यावर आज भोपाळमध्ये अंत्यसंस्कार

Martyr Varun Singh was cremated in Bhopal todayशहीद वरुण सिंह यांच्यावर आज भोपाळमध्ये अंत्यसंस्कार  Marathi National News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (10:41 IST)
8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातातील एकमेव बचावलेले वरुण सिंग यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर बेंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. 
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर आज सकाळी 11 वाजता भोपाळमधील बैरागढ येथील मुक्तिधाम येथे शासकीय आणि लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
वरुण सिंह यांचे पार्थिव गुरुवारी भोपाळला आणण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे लोक जमले होते. हवाई दलाचे अधिकारी आणि मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री विश्वास सारंग यांनीही भोपाळ विमानतळावर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.  
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा शेवटचा प्रवास बैरागढ मिलिटरी हॉस्पिटलपासून सुरू होईल. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि निरोप घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा  लोकांची गर्दी होऊ लागली आहे. लाकड्या ऐवजी वरुण सिंह यांच्यावर शेणाच्या पोळीने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातातील एकमेव बचावलेले वरुण सिंग यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला 
8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातातील एकमेव बचावलेले वरुण सिंग यांचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला  त्यांच्यावर बेंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. विमान अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह 13 अधिकारी शहीद झाले होते. वरुण हे मूळचे यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील खोर्मा कान्होली गावचे रहिवासी होते. 
सध्या वरुण सिंगचे वडील सेवानिवृत्त कर्नल केपी सिंग सन सिटी कॉलनी, एअरपोर्ट रोड, भोपाळ येथे राहतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यूपी योद्धाने पीकेएल हंगामापूर्वी आफ्रिकन वंशाच्या खेळाडूला करारबद्ध केले