Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले

sanjay raut
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (21:45 IST)
खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. राणा यांनी दाऊद गँगशी संबंधीत आणि ईडीने ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून लाखो रुपये घेतले होते, असा आरोप केला आहे. याचे फोटोसह ट्विट राऊत यांनी केले आहे.
 
नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी दिलेल्या अॅफिडेविटवर नमूद आहे. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सदनिकांसाठी सोडत