वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
त्यामुळे एकप्रकारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री गडकरी यांनी आपल्या कामातून विश्वविक्रमाचीच नोंद केली आहे. तर, याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शब्दांमध्ये त्यांचे अभिनंदन केले आहे.