Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनावर उपचारासाठी विराफिन औषधाला आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी

कोरोनावर उपचारासाठी विराफिन औषधाला आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी
, शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (19:00 IST)
कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशभरात कळस गाठलेला असताना एक आशादायी बातमी समोर आलीय. ती म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadilla) हेल्थकेअरच्या एका औषधाला भारताच्या औषध नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.
 
Drug Controller General of India अर्थात DCGI ने झायडस कॅडिलाच्या विराफिन (Virafin) या औषधीला कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वापर करण्यास मान्यता दिली आहे. या औषधीचं संपूर्ण नाव Pegylated Interferon alpha-2b किंवा PegIFN असं आहे.
 
हे आपत्कालीन परवानगी (Emergency Approval) असून, ते मर्यादित प्रमाणात वापरता येईल, असंही DCGI ने सांगितलंय.
 
कंपनीने DCGI ला दिलेल्या अर्जात म्हटलं होतं की, 'या औषधामुळे रुग्ण लवकर बरे होत असून, त्यांच्या उपाचारातला गुंताही यामुळे कमी करता येतो.'
 
तसंच, एका डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनवरच हे औषध रुग्णांना दवाखान्यात किंवा विशेष उपचार संस्थानांमध्ये दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
 
देशभरात 20-25 ठिकाणी झालेल्या चाचणीत असं लक्षात आलं होतं की, विराफिन या औषधाच्या वापरामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज कमी भासू लागली होती. म्हणजेच श्वसनक्रिया सुधारण्यात विराफिन मदत करत होतं.
 
या औषधामुळे इतर व्हायरल संसर्गांवरही उपचार शक्य असल्याचं कंपनीने DCGI ला केलेल्या अर्जात म्हटंलय.
 
म्हणजेच काही प्रमाणात आतापर्यंत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या औषधांवरच अवलंबून राहावं लागत होतं, ते आता कमी होण्याची शक्यता आहे.
 
याशिवाय झायडस कॅडिला ही कंपनी कोरोनाच्या एका लशीवरही काम करते आहे. ZycovD नावाची ही लस DNA प्लॅटफॉर्मवर बनवली जात आहे. यासाठी झायडस कॅडिला भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाची मदत घेते आहे. आणि याच्या क्लिनिकल ट्रायल्सचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार