राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी अमृत उद्यानाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवार ते 15 सप्टेंबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत हे उद्यान जनतेसाठी खुले राहणार आहे. अंतिम प्रवेश संध्याकाळी 5.15 वाजता होईल. यावेळी अमृत उद्यानातील स्टोन ॲबॅकस, साउंड पाइप आणि म्युझिक वॉल हे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
अमृत उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना तुळशीच्या बियांपासून बनवलेले 'बीज पत्रे' देखील दिले जातील, जे एक अद्वितीय आणि पर्यावरणपूरक स्मृतीचिन्ह आहे, असे राष्ट्रपतींच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी सांगितले. बियांची पाने अभ्यागतांना त्यांच्या घरी हिरवीगार पालवी वाढवण्यास प्रोत्साहित करतील. हे कागदाचे तुकडे जमिनीत पेरून लोक हिरवाई वाढवू शकतात आणि निसर्गाचे संगोपन करू शकतात.
या उद्यानात स्टोन ॲबॅकस, 'साऊंड पाइप आणि म्युझिक वॉलही आहे, जे लहान मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. अमृत उद्यान देखभालीसाठी सर्व सोमवारी बंद राहणार आहे. नॉर्थ एव्हेन्यू रोडजवळील राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून जनतेसाठी प्रवेश असेल.
आरक्षण स्लॉट आणि उद्यानात प्रवेश विनामूल्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करता येईल. 'वॉक-इन व्हिजिटर्स'साठी गेट क्रमांक 35 च्या बाहेर ठेवलेल्या सेल्फ-सर्व्हिस किओस्कमधूनही बुकिंग करता येणार .