Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर के नगरची पोटनिवडणूक रद्द

आर के नगरची पोटनिवडणूक रद्द
तामिळनाडूतील आर के नगर मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला संविधानातील कलम ३२४ नुसार विशेषाधिकार असतात. यामध्ये निवडणूक रद्द करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. आर के नगमरधील निवडणूक प्रक्रीया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. ही निवडणूक १२ एप्रिल रोजी होणार होती .
 
आर के नगर मतदार संघातील निवडणूक ही वादग्रस्त ठरली होती. निवडणुकीत एआयएडीएमकेचे उमेदवार आणि शशिकला यांचे निकटवर्तीय टी टी व्ही दिनकरन यांच्या विजयासाठी मतदारांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ९० कोटी रुपये वाटल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने आरोग्यमंत्री सी विजयभास्कर यांच्या घरावर छापे टाकले होते. ३५ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती. यामध्ये आयकर विभागाला चार डायरी मिळाल्या होता. या डायरीमध्येच मतदारांना दिलेल्या पैशांची सविस्तर माहिती आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च