Rajkot : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे. सर्वत्र गणेशोत्सव आनंदानं साजरा केला जात आहे. काल पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. या दरम्यान गणेश विसर्जनाच्या वेळी नद्या आणि तलावात भाविक बुडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. गुजरातच्या राजकोट येथे गणपती विसर्जनाच्या वेळी धरणात काका -पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुजरातच्या राजकोट येथे कोठारीया रोडच्या मणिनगर सोसायटीतील काका पुतणे गणपती विसर्जनासाठी आजीडॅमला गेले. पाण्याच्या मधोमध ते गणपती विसर्जनासाठी गेले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आलं नाही आणि ते पाण्यात बुडाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा शोध घेतला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.